सामाजिक चळवळ

 

            सामाजिक चळवळ


  • प्रस्तावना : 

                     


      एखाद्या समाजात निर्माण झालेल्या सामाजिक समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी मोठ्या स्तरावर समुदायाद्वारा केला जाणारा सामूहिक प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ होय. सामाजिक चळवळ ही समाज या सांस्कृतिक नवीन परिवर्तन करण्यासाठी किंवा त्या परिवर्तनाचा विरोध करण्यासाठी निर्माण होते. या चळवळीचा मुख्य उद्देश सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात पूर्णत: किंवा अंशिक परिवर्तन करणे हा असतो. सामाजिक विकासादरम्यान काही चांगले वा वाईट तत्त्व उदयास येतात. चांगले तत्त्व सामाजिक प्रगतीस सहाय्यभूत ठरतात. पण वाईट तत्त्व सामाजिक समस्या निर्माण करतात. त्यावेळेस समाजातील काही काही विचारवंत वा बुद्धिवादी त्या तत्त्वांना नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतात. असे व्यापक स्वरूपात प्रयत्नच सामाजिक चळवळ या नावाने उदयास येतात.


सामजिक चळवळीचा अर्थ : 

       सामाजिक चळवळ म्हणजे मानवी संबंधामध्ये निर्माण होणाऱ्या आंतरक्रियांची अशी अवस्था होय, की जी निरंतर पुढे सुरू राहणारी प्रक्रिया दर्शविते.

         सामाजिक चळवळ या संकल्पनेच्या नेमक्या अर्थाबाबत समाजशास्त्रज्ञ आजही आपापसांत वाद घालत असले, तरी सामाजिक चळवळ ही संज्ञा वापरणाऱ्याला काय अभिप्रेत असते याबद्दल स्थूलमानाने बहुतेक समाजशास्त्रज्ञात एकवाक्यता आढळते. प्रचलित संस्कृतीचा अगर समाजव्यवस्थेचा किमान काही यासाठी अनेक माणसे एकत्र येऊन जाणूनबुजून संघटित प्रयत्न करतात तेव्हा सामजिक चळवळ आकार घेऊ लागते. अशा चळवळीत सामील होणाऱ्या माणसाची काही मूल्यांशी बांधिलकी असते. आपली मूल्ये साध्य करण्याच्या दृष्टीने वापरावयाच्या आखावयाच्या धोरणाविषयी व डावपेचाविषयी एकमत असते. त्यामुळे निश्‍चित लक्ष डोळ्यासमोर ठेवून काम करणारा माणसांचा एक गट म्हणून समाजामध्ये त्याला एक अस्तित्व व अस्मिता लाभते. चळवळ जसजशी रुजू लागते आणि वाढू लागते तसतशी आपण सगळे एक अर्थी भावना चळवळीतील माणसांमध्ये दृढ होऊ लागतो. या अर्थाने सामाजिक चळवळ ही स्स्त्यावरच्या गर्दीपेक्षा किंवा जत्रेला लोटणाऱ्या माणसांच्या झुंडीपेक्षा वेगळी असते. कमी-अधिक प्रमाणात ती संघटित असते.

                   


    एखाद्या समाजात निर्माण झालेल्या सामाजिक समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी मोठ्या स्तरावर समुदायाद्रार केला जाणारा सामूहिक प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ होय. सामाजिक चळवळ ही समाज व  संस्कृतीत नवीन परिवर्तन करण्यासाठी किंवा त्या परिवर्तनाचा विरोध करण्यासाठी निर्माण होते.


" Movement " या इंग्रजी शब्दासाठी चळवळ' किंवा आंदोलन हे दोन्ही शब्द वापरण्यात येतात. मात्र आंदोलन हा शब्द हिंदीत जास्त प्रचलित आहे.

    

         संदर्भ : महाराष्ट्रातील चळवळी (सामाजिक आणि राजकीय )

   

 

  

  

 

 


  

Post a Comment

0 Comments