सामाजिक चळवळीच्या व्याख्या :
१ ) हार्टन व हंट :-
" सामाजिक चळवळ म्हणजे समाज किंवा त्याच्या सदस्यांद्वारा परिवर्तन घडवून आणणे किंवा त्याचा विरोध करण्यासाठीचा सामूहिक प्रयत्न होय. "
२) हर्बर्ट ब्लूमर :-
“ सामाजिक चळवळ हा असा एक सामूहिक प्रयत्न आहे, की ज्यातून जीबनाची नवीन व्यवस्था निर्माण होते .
३) मेरीक व एल्डिज :-
“ रूढी या रीतिरिवाजास परिवर्तन करण्यासाठी अधिक वा कमी प्रमाणात जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ होय.
४) एम.एस.ए.राव :-
“ सामाजिक चळवळ समाजातल्या एका भागाद्वारा संघटित स्वरूपात केला जाणारा प्रयत्न आहे. ''
५) अंडरसन आणि पार्कर :-
“ सामाजिक चळवळ ही एक गतिशील , सामूहिक वर्तन आहे. जे एक संरचना विकसित करते आणि ज्याचा उद्देश सामाजिक व्यवस्थेत आंशिक वा पूर्ण संशोधन करणे असा असतो.
६) लाँग आणि लँग :-
सामाजिक चळवळ अशा व्यापक आधारावर असते , की ज्याचा उद्देश सामाजिक व्यवस्थेतील मुलभूत स्वरूपावर प्रभाव टाकणे आणि त्यास नवे स्वरूप प्रदान करणे हा असतो.
७) कायरामनने :-
" जेव्हा मोठ्या संख्येने लोक विद्यमान संस्कृतीत वा सामाजिक व्यवस्थेत वा त्याच्या एका भागात परिवर्तन करण्यासाठी वा दुसरी व्यवस्था वा भाग स्थापन करण्यासाठी एकसंघ प्रयत्न करतात. त्यास सामाजिक चळवळ म्हणतात"
८) हस रोंच :-
" समाजात सामूहिकस्तरावर अनुभवल्या जाणाऱ्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी फार मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या चळवळीला सामाजिक चळवळ म्हणतात. "
9) टर्नर आणि किलीयन :-
" एखाद्या समाजात किंवा मानवी समूहात लोक सामूहिकरीत्या आणि सातत्याने अशी कृती करीत राहतात, की जी समाजात विरोध आणि परिवर्तन यांना चालना देते. तिला सामाजिक चळवळ असे म्हटले जाते."
10) एस.एन. आय. सेर्तेदृढ :-
सामाजिक चळवळ हे एक संघटन आहे , की ज्याच्या माध्यमातून एखादी राजकीय मागणी मांडली जाते आणि तिच्या आधारे प्रस्थापित राजकीय व्यवस्थेत परिवर्तन घडविण्यासाठी काही आधारही प्रस्तुत केले जातात .
११) शेरीफ व शेरीफ :-
सामाजिक चळवळ म्हणजे मानवी संबंधामध्ये निर्माण होणाऱ्या आंतरक्रियांची अशी अवस्था होय , की जी निरंतर पुढे सुरू राहणारी प्रक्रिया दर्शविते.
संदर्भ : महाराष्ट्रातील चळवळी ( सामाजिक आणि राजकीय )
0 Comments