संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती
विद्यापीठ गीत
* संत गाडगे बाबा गीत *
जनमन जागर करीत, निरंतर, विद्यापीठ चाले
संत गाडगे बाबा तुमचे स्वप्न पूर्ण झाले
विद्या चिंतन । विद्या मंथन
विद्या सर्जन । विद्या जीवन ।
कुणी न आता खुळे अडाणी, ज्ञानासह विज्ञान कळाले
पर्ण कुटीतील प्रतिभेलाही, आभाळाचे पंख मिळाले.
दशसूत्राचे अक्षर अक्षर, वेद नवा बोले ।।१ ।। जनमन....
किती रंजले किती गांजले, किती आंधळे लुळे पांगळे
कर्मयोग निष्काम आचरुन कवेत घेता बांधव सगळे
भूतदयेच्या ओलाव्याने, मानस मोहरे ।।२ ।।जनमन....
धर्मजातीच्या पलीकडेही माणूस केवळ माणूस असतो भेदभ्रमांचे बंध तोडूनी मानवतेची पूजा करतो.
पिढ्यापिढ्यांचे जीवन दर्शन विश्वात्मक झाले...
जनमन जागर करीत, निरंतर, विद्यापीठ चाले
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ गीत MP3 Download
0 Comments