व्यक्तिमत्त्व (Personality)

 व्यक्तिमत्त्व (Personality) 

                  


संकल्पना :- 

        कोणत्याही दोन व्यक्ती ह्या सारख्या नसतातच. एक व्यक्ती ठेंगणी असेल तर दुसरी व्यक्ती उंच, गोरीपान, दणकट, रुबाबदार असेल. सर्वसाधारण व्यक्तीमत्त्वाचा संबंध शरीरयष्टी व शारीरिक जडणघडणीसी असतो. ठुसका, काटक, काळाशार, सडपातळ, तेजस्वी, रागीट, संवेदनाशील, निर्भिड ही विशेषणे सुद्धा व्यक्तिमत्त्वाची वर्णन करण्यासाठी वापरली जातात. कधीकधी व्यक्तीने नविन कपडे घातले असल्यास तो सुद्धा व्यक्तीमत्त्वात भर टाकतो. केस व्यवस्थित केलेले, दाढीकटींग केलेले स्वच्छ कपडे घातलेले लोक उठूण दिसतात. समोरच्या व्यक्तीवर छाप पाडण्याची कला किंवा आपला ठसा उमटविणे हेही व्यक्तिमत्त्वामध्ये अभिप्रेत आहे.

          व्यक्तिमत्त्व ह्या मराठी शब्दाला इंग्रजीमध्ये Personality म्हणतात. Persona ह्या लॅटीन शब्दापासुन तो आला आहे. Persona ह्या शब्दाचा अर्थ 'मुखवटा' असा होतो. रोमन लोकांनी या शब्दाला 'व्यक्ती कशी दिसते आहे.' असा अर्थ दिला व ह्यामधूनच Personality हा शब्द बनला आहे. म्हणून व्यक्तिमत्त्व या शब्दासाठी Personality हा शब्द उपयोगात आणला जातो.

व्यक्तिमत्त्वाच्या व्याख्या (Definition) :

१) नार्मन मन , " व्यक्तिची शरीरयष्टी, आवडीनिवडी, क्षमता व अभिक्षमता यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्त्व होय."

२ ) गार्डन आल्पोर्ट, "वातावरणासी समायोजन प्रस्थापित करणाऱ्या मानस भौतिक पद्धतीच्या गतिशील संघटनास व्यक्तिमत्त्व म्हणतात."

३. वूडवर्थ (Woodworth) , "आचारविचार, आवडीनिवडी, कार्य करण्याची पद्धती व जिवनविषयक तत्वज्ञान यातून व्यक्त होणारे समुच्चयात्मक स्वरुप म्हणजे व्यक्तिमत्त्व होय. "

४. आयझेंक, "व्यक्तिमत्त्व म्हणजे व्यक्तिचे चारित्र्य, स्वभाव व बुद्धि व शरीरयष्टी यांचे कमी जास्त व टिकाऊ स्वरूपाचे संघटन होय की, जे घटक व्यक्तिचे त्याच्या वातावरणासी झालेले वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करते."

        व्यक्तिच्या वर्तनामधून काही विशिष्ट अशी लक्षणे दिसून येतात, त्यांना Trait असे म्हणतात.

संदर्भ : अभिनव सामान्य मानसशास्त्र

Post a Comment

0 Comments