अमेरिकेमधील सामाजिक गटकार्याचा इतिहास
( History of Group Work in America )
अमेरिकेमध्ये गटकार्याचे व्यवसायिक स्वरुप प्राप्त झाले. अभ्यासक्रमामध्ये सामाजिक गटकार्याचा समावेश करण्यात आला. अमेरिकेमधील Western Reserve University मध्ये Group Service Work नावाने १९२० मध्ये अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. या अभ्यासक्रमास अन्य संस्थांनी मान्यता प्रदान केली. यामध्ये गट कार्यकर्ते काम करु लागले. यानंतर शाळेमध्ये १९२५ नंतर अर्थात School of Social Work मध्ये सामाजिक गटकार्य सुरु करुन व्यक्तिचा मानसिक अभ्यास होवू लागला आणि अमेरिकेमध्ये गटकार्याला मान्यता देण्यात आली. Council on Social Work Education स्थापन करण्यात आले. शाळा, महाविद्यालय व पारंगत शिक्षणामध्ये सामाजिक गटकार्य अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला. गटकार्याचा अभ्यास आणि प्रयोग सामाजिक कार्यकर्ते करु लागले.
१९४६ मध्ये अमेरिकेमध्ये American Association of Group Workers नावाने गटकार्याची संघटना स्थापन करण्यत आली. अमेरिकेमध्ये गटकार्य अभ्यासाकरीता नवीन नवीन क्षेत्रामध्ये प्रयोग करण्यात आले. आरोग्य, बालमार्गदर्शन, बालसंस्थामध्ये गटकार्याचा प्रयोग करु लागले.
१) गरीब, निर्धन व्यक्तिंना साह्य
२) गरीबांना भोजन व्यवस्था
गरीब व निर्धन व्यक्तिंकरीता अमेरिकेमध्ये १६५७ मध्ये प्रथम भिक्षागृहाची स्थापना करण्यात आली. यानंतर १६५८ मध्ये Playmouth Colony मध्ये कार्यगृह उभारण्यात येवून येथे लोकांना मदत होवू लागली. गरीब कायद्याची अमंलबजावणी करुन गरीबांना मदत करण्यात येत होती. गरीब लोकांना काम मिळू लागले. गरीब कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याकरीता १८२३ मध्ये न्यूयार्क मध्ये जे. बी. ए. येटप्स समिती स्थापन करण्यात येवून गरीबांना देण्यात येणाऱ्या मदतीचे विभाजन करण्यात आले. या समितीनुसार गरीबांना देण्यात येणारी मदत पुढील प्रमाणे :
१) गरीब व्यक्तिंना कायम स्वरुपी मदत.
२) गरीब व्यक्तिंना अस्थायी मदत.
३) रस्त्यावर भिक मागण्यास बंदी,
४) योग्य व्यक्तिस भिक मागण्यास प्रवृत्त करणाऱ्यास शिक्षा.
५) श्रम करणाच्या गरीब व्यक्ति करीता सुधारगृहाची निर्मिती.
६) गरीबांकरीता निवासाची व्यवस्था.
७) प्रौढ व्यक्ति, जे काम करण्यास योग्य असेल किंवा सक्षम असेल अशांना गरीब संबोधू नये.
८) गरीब व्यक्तिच्या बालकांची शिक्षणाची सोय इ.
वरील समितीच्या शिफारशीनुसार राज्यामध्ये अनाथआश्रमाची स्थापना करण्यात आली.
सर्व बाबी विचारात घेतल्यानंतर १८२४ मध्ये न्युयॉर्क मध्ये 'काऊन्टी निर्धन कायदा'- पारीत करण्यात आला. यानंतर राज्यामध्ये रुग्णालय, मनोरुग्णाकरीता गृह, सुधारगृह स्थापन करण्यात येवू लागली.
दान संघटना :
गरीबांना साह्य करण्याच्या उद्देशाने व पैशाचा योग्य उपयोग करण्याकरीता १८७७ मध्ये न्युयॉर्कला रेवरेन्ड एम. एच. गुररीन ने दान संघटना स्थापन केली. गरीब कुटुंबांचे पुनर्वसन करुन त्यांना साह्य करण्याकरीता विशेषतः हि समिती कार्य करु लागली.
दान संघटनेची कार्य :
१) गरीब व्यक्ति व त्यांच्या कुटुंबांना मदत करणे.
२) गरीबांना शिक्षण देणे.
३) गरीब व्यक्तिंचे पुनर्वसन करणे.
युवक कल्याण Youth Welfare
अमेरिकेमध्ये युवकांचा उत्कर्ष करण्याकरीता युवा संघटनेची स्थापना करण्यात आली. १८५१ मध्ये Young Men's Christian Association ची स्थापना करण्यात आली. यानंतर युवकांच्या कल्याणाकरीता विविध संघटना स्थापन करण्यात आल्या याद्वारे ,
१) युवकांचा शैक्षणिक विकास
२) युवकांच्या आरोग्याचा विकास
३) युवकांना आत्मनिर्भर बनविणे
४) व्यक्तिमत्वाचा विकास
संदर्भ :- समाजकार्याच्या प्रत्यक्ष स्वरुपाच्या पद्धती
0 Comments