खाजगीकरण (Privatisation)
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रात उदयोग सुरु करण्यात आले. समाजवादी समाजरचनेत सार्वजनिक उद्योगांना अग्रक्रम देऊन त्यांच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास साधण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले. पं. जवाहरलालजी नेहरू या धोरणाचे प्रवर्तक होते. नवीन उद्योगांना ते 'आधुनिक देवालये' (Modern Temple) म्हणून संबोधित. त्या उद्योगातून सूई पासून तर ट्रॅक्टरचे उत्पादन होऊ लागले. काही खाजगी परंतु आजारी असलेल्या उदयोगाचे सार्वजनिक उद्योगात रूपांतर करण्यात आले. परंतु पुढील काळात सार्वजनिक उद्योग हे सरकारी उद्योग ठरले. आरंभीच्या काळातील सार्वजनिक उद्योगात असलेले चैतन्य हळू हळू संपुष्टात आले. सार्वजनिक उद्योगांची घसरण सुरू झाली. नफ्यात चालणारे उदयोग तोट्यात चालू, लागले. मालाचे उत्पादन, गुणवत्ता, गुंतवणुकीचा परतावा थांबला म्हणजेच बरेच, सार्वजनिक उदयोग डबघाईला आले. हे चित्र १९८९ च्या दशकातील होते. या काळात अनेक देशांतील उदयोगातसुदधा ही परिस्थिती प्रत्ययास आली. काही देशांमध्ये सार्वजनिक उदयोगांचे खाजगीकरण करण्यात आले. या काळात ८० देशातील उद्घोगांचे त्या त्या देशाच्या पद्धतीप्रमाणे खाजगीकरण करण्यात आले.
भारतातील आर्थिक दुरवस्थेच्या काळात डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्र्याचा कारभार हाती घेतला. त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF) आणि जागतिक सहाय्य मागितले. यह्या संस्थांच्या दबावामुळे आर्थिक स्थैर्यासाठी पूर्वअट म्हणून अर्थव्यवस्थेच्या खाजगीकरण, उदारीकरण म्हणजेच जागतिकीकरणाला मान्यता द्यावी लागली. अशो प्रकारे उदयोगधंदयाच्या खाजगीकरणाची व्यापक प्रमाणात सुरुवात झाली. मागील १५ वर्षात आर्थिक व राजकीय कारणाने खाजगीकरणात अनेक चढउतार दिसून आले. तरीही ही प्रक्रिया अबाधितपणे चालू आहे. १९९१ मध्ये शासनाने 'नवीन औद्योगिक धोरण' जाहीर करुन सार्वजनिक खाजगीकरणास चालना दिली आहे. १ जाने. १९९५ सैजी गट करारावर सही करण्यात येऊन डंकेल प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यामुळे परकीय भांडवलाचा प्रवेश विदेशी उदयोगांना मुक्त प्रवेश व काही सार्वजनिक उदयोगाची विक्री करण्यात आली.
व्याख्या -
एस. के. मिश्रा आणि व्ही. के. पुरी यांच्या मताप्रमाणे -
' खाजगीकरण ही प्रक्रिया असून त्या माध्यमातून शासन उत्पादनक्रियाकलापाचे व सार्वजनिक उपक्रमाचे खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरण करते. '(Privatisation is a process by which the government transfers the Productive activ ity from the public sector to the Private Sector.)- S. K. Misra & V. K. Puri.
थोडक्यात,
(१) भारतीय अर्थव्यवस्थेत खाजगीकरणाचा आरंभ १९९१ पासून झाला.
(२) खाजगीकरण ही प्रक्रिया आहे.
(३) या प्रक्रियेत सार्वजनिक क्षेत्राचे खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरण करण्यात येते.
(४) खाजगीकरणात उद्योगधंदयांबरोबर सेवाक्षेत्राचा सुद्धा समावेश करण्यात येतो. उदा. वीजनिर्मिती व वितरण, शिक्षण व वैदयकीय सुविधा, वाहुतकीचे क्षेत्र इ.
इंग्लंड, फ्रान्स, चीनमध्ये काही क्षेत्राचे खाजगीकरण करण्यात आले आहे. न्यूझीलंड देशात पोस्टाचे खाजगीकरण झाले आहे. काही देशांत खाजगीकरणात शासन कंब्ाटदार नेमते. जसे - रस्ते स्वच्छ ठेवणे, कचरा गोळा करणे, शासकीय इमारतीचे बांधकाम, रस्ते व त्यावरच्या पुलांचे बांधकाम, भारतात टप्प्या-टप्प्याने खाजगीकरण सुरू आहे. त्यासाठी केंद्रसरकारने ' निर्गुंतवणुक मंत्रालय' सुरु केल आहे. भारतातील बहुतांशी राजकीय पक्षांनी खाजगीकरणाला संमती दिली आहे. परंतु कोणत्या उदघोगांवे खाजगीकरण करावे? कोणत्या पद्धतीने करावे? कोणत्या गतीने करावे? खाजगीकरणाचा प्राधान्यक्रम कोणता असावा? या संबंधी प्रत्येक पक्षाची भूमिका वेगवेगळी आहे.
0 Comments