नोकरीच्या संधी



* नोकरीच्या संधी *

बी.एस.डब्ल्यु. व एम.एस.डब्ल्यू. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागात परिविक्षा अधिकारी, अधिक्षक, समाजकल्याण अधिकारी, विस्तार अधिकारी इ. पदावर नियुक्त होता येते. तसेच समाजकल्याण विभागाद्वारे अनुदानीत आश्रमशाळा, अपंग , अंध विद्यालय हत्यादीमध्ये अधिकारी पदावर, वैद्यकीय क्षेत्रामध्ये वैद्यकिय समाजकार्यकर्ता, जेलमध्ये अधीक्षक, कारखान्यामध्ये लेबर इन्सपेक्टर, लेबर ऑफीसर, सामुदायीक विकास क्षेत्रामध्ये विस्तार अधिकारी, प्रकल्प अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, जलस्वराज्य, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद, नगर परिषद व मोठे कारखाने इत्यादी क्षेत्रामध्ये सहज नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. यामुळे आपण करीत असलेल्या अभ्यासाचा शास्त्रीय दृष्टीकोन लक्षात घेऊन स्वहीत सांभाळणे अत्यंत आवश्यक असते. विकास कार्यामध्ये लोक सहभागाचे महत्व दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे समाजकार्याच्या विद्यार्थ्यांसाठी नवनवीन क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत नगर विकास मंत्रालयात तर गरीब गलीच्छवस्ती सुधार कार्यासाठी अधिकाऱ्यांच्या जागा याच क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने राखल्या जातात. अभ्यास करीत असतांना व्यक्तिमत्व विकास, सहकार्याची भावना, सामुदायिक जाणीव, समाजामध्ये काम करण्यासाठी आवड यामुळे समाजकार्य स्नातक व पारंगत झालेले विद्यार्थी यशस्वी कारखानदार व व्यापारी झालेले आज आपणास दिसुन पडतील. अशा नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन आपण आपले उज्वल भविष्य निश्चित करा. आपल्या घरासमोर चालत आलेल्या सुवर्ण संधीचा सदुपयोग करा.

समाजकार्याचे 5 क्षेत्र आहेत. या क्षेत्रांतर्गत विविध विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्या खालील प्रमाणे आहेत.

समुदाय विकास : 

प्रकल्प अधिकारी, ग्रामिण विकास अधिकारी, कार्यक्रम अधिकारी, प्रकल्प समन्वयक, समुदाय संघटक , विस्तार अधिकारी, तसेच पर्यवेक्षक, समुपदेशक, ग्रामसेवक महिला व बालविकास : कौटूबीक सल्लामार्गदर्शन केंद्र, अनाथालय, वृद्धाश्रम , महिला आधारगृह, स्टेम, यामध्ये समुपदेशक व बालविकास अधिकारी.


अपंग कल्याण : 

अंध, मुकबधीर, शारीरीक मानसिक विकलांक मतीमंद मुलांच्या शाळेमध्ये अधिक्षक गृष्पाल श्रमकल्याण व मानसोपचार : रुग्णालये, मानसिक उपचार केंद्र व्यसनमुक्ती केंद्र कखत (एडस्) संबधी काम करणाऱ्या संस्था व आरोग्य विभागात  समुपदेशक समाजकार्यकर्ता जिल्हा सामान्य रुग्णालय. 

 अपराध व सुधार : 

कारागृह, परिवीक्षा, अधिकारी सुधारगृह, रिमांड होम, बालन्यायालय यामध्ये कल्याण अधिकारी , समाज कार्यकर्ता , समुपदेशक व ह्या व्यतिरिक्त विविध विभागात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

Print

Post a Comment

0 Comments