भावनाविषयक सिद्धांत (Theories of Emotions):

         भावनेसंबंधी निरनिराळे सिद्धांत मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत. आपल्या डोळ्यासमोर जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा आपण भावना व्यक्त करतो. काही शरीरामध्ये अंतर्गत बदल सुद्धा घडून येतात. तेव्हा भावनात्मक अनुभवाचे वर्णन करणारे सिद्धांत पुढीलप्रमाणे आहेत.

                       


१) जेम्स - लॅंगचा सिद्धांत (James-Lange Theory):

        राग, कौर्य, क्रुरता, भिती ह्या भावना जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा त्या भावनांना उल्लेखूनच आपल्या शरीराकडून बर्तन होत असते. त्या सिद्धांताने असे प्रतिपादन केले आहे की, आपल्याला चेतकाचे प्रत्यक्षतः ज्ञान होताच आपल्या शरीराकडून शारीरिक परिवर्तन घडून येतात हे त्या चेतकाला अनुसरूनच घडून येत असतात. व ही बदले घडून आल्यानंतर त्याची जी आपल्याला भावनात्मक संवेदन होते त्यालाच भावना असे म्हणतात. त्याचा मतितार्थ असा आहे की, एखादा भितीदायक प्राणी पाहताच आपण घाबरतो व भितो व मागच्या दिशेनेच पळून जाण्याचा प्रयत्न करतो, असे म्हणणे ह्या सिद्धांतानुसार चूक आहे आपण असे म्हटल्यास वावगे होणार नाही की, आपण भितीदायक प्राणी पाहताच आपले हातपाय थरथर हालु लागतात, शरीराला पाम फुटता पळूनी जाये ह्या स्थितीने शरीर धारणवृत्ती होते. कंप सुटणे, अंगाला काटे येतात ह्या सर्व माहितीची जाणीव होताच आपण भयग्रस्त होतो. त्या शारीरिक परिवर्तनाच लँगने भावना म्हटलेले आहे.

      आनंद , क्रोध, शोक, राग, लालबुंद चेहरा इत्यादी भावनाचे मुळ कारण आंतरिद्रिय कारक घडामोडी होय. अशाप्रकारे जेम्स-लंग सिद्धांतानुसार आपल्याला परिस्थितीचे संपूर्ण माहिती होताच संवेदनाच्या गुणांना अनुसरून शरीरामध्ये अनेक अशा आंतरिक घडामोडी होतात व त्याची जाण होणे म्हणजे भावना होय. जैविक बदलासंबंधीच्या माहितीचे विस्तृतः रुप म्हणजेच भावना होय. पुढील आकृती पाहिल्यास आपल्याला दिसून येईल.

         भावना निर्माण करणाऱ्या चेतकाचे ज्ञान मेंदू पृष्ठाला झाल्यानंतर मेंदूत निर्माण होणारे मजावेग स्वायत्त मज्जासंस्थेला उद्दिपीत करतात. ह्या मज्जासंस्थेच्या प्रतिक्रियामुळे मेंदूला भावनात्मक अनुभवाची जाणीव होते, असे जेम्स-लंग सिद्धांत प्रतिपादन करतो.

                     


२) कॅनन-बाई सिद्धांत (Cannon Bord Theory) :

        ह्या सिद्धांताला आकस्मिकता किंवा हायपोथॅलमिक सिद्धांत असेही म्हणतात. ह्या सिद्धांतानुसार हायपोर्थेलमसच्या संचालनामुळे व ज्ञानात्मक अनुभव  व शारीरिंद्रिये घडामोडी ह्या दोन घटकांना एकदमच चेतना मिळते व त्यामुळे भावना निर्माण होतात.

     बाहेरील वातावरणाची जाणीव आपल्याला नाक, डोळे, कान, घ्रामेटिये इत्यादीमुळे होते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण विशिष्ट दिशेकडे पाहातो, चालतो किंवा आपल्याला घाम फुटतो व कंप येतो. तेव्हा स्नायुतील पेशी ह्या उदिपीत झालेल्या असतात. त्याचप्रमाणे शरीरातील ग्राहके किंवा पेशी चेतीत झाल्या म्हणजे शरीर थरकापल्यासारखे वाटणे, घाम येणे, मळमळ सुटणे पोटामध्ये खळबळल्यासारखे होणे इत्यादी बाबीचे आपल्याला ज्ञान होत असते. हा सर्व पेशी इद्रियांच्या उद्दिपनामुळे निर्माण होणारे आवेग मज्जातंतुच्या द्वारा पृष्ठरजुमधून, सरळ थैलमसमधून जातात. प्रयोगाच्या दृष्टीने हायपोथैलमसचा काही भाग नष्ट केला तर त्याचे भावनात्मक जीवनच नष्ट होईल. अशाप्रकारे भावनेच्या निर्मितीत हायपोथैलमसचे महत्त्व आहे.

       मज्जावेग हे हॉयपोथॅलमसच्या माध्यमातून मध्यवर्ती मज्जाकेंद्रात जातात. त्याचप्रमाणे मज्जाकेंद्रातून हॉयपोरथैलमसकडे मजा बेग येत असतात. ह्या मज्जावेगांनी अँड्रीनल ग्रंथी उद्दिपीत होतात. व अड्डीनलचे शरीरामध्ये उत्सर्जन होते. त्यामुळे आंतरद्रिये पेशी उद्दिपीत होतात व त्याच्या उद्दिपनाचे आवेग पून्हा मेंदूकडे जातात. अशाप्रकारे भावनेची निर्मिती होते.

        ह्या सिद्धांतामध्ये प्रामुख्याने हायपोथैलमसला महत्त्व दिलेले आहे. भावना निर्माण किंवा जागृत करणारे आवेग हॉयपोरथेलमसला जागृत करतात व आवेगाचे विचलन त्या मेंदुपृष्ठाकडे होते. त्यामुळे भावना जागृत होते.

                    


३. बोधनात्मक सिद्धांत (Cognitive Theory) :

        भावनेसंबंधीचा हा बोधनात्मक सिद्धांत होय. शँक्टर व सिंगर (१९६२) यांच्या मतानुसार ह्या भावनात्मक सिद्धांताचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे सर्वसाधारणतः जैविक उत्तेजना किंवा प्रक्षुब्धता हे होय.

        विशिष्ट भावनात्मक अवस्था जैविक प्रक्षुब्धतेची व त्या प्रक्षुब्धतेला कारणीभूत झालेल्या वातावरणाच्या बोधात्मक गुणाची निर्मिती होय. ज्या गोष्टीमुळे किंवा घटनेमुळे एखादी आनंदी भावना निर्माण होते त्यांना अनुलक्षून व त्या घटनेच्या बोधनात्मक गुणांच्या सहाय्याने व्यक्ती ही त्या उत्तेजनात्मक भावनाना राग', 'भिती', 'कुर अशी नावे ठेवतो. ह्या बोधनात्मक उपपत्तीची सक्रियता निक्षुण पाहण्यासाठी शेक्टरने काही विद्यार्थ्यांना जेविक प्रक्षुब्धता निर्माण करण्यासाठी अड्रेनीनचे इंजेक्शन दिले. प्रयुक्त व्यक्तीला सूचना दिल्या होत्या की, आपल्या डोळ्यावर काही परिणाम होतात का? हे पाहण्यासाठी इंजेक्शन देण्यात येते. आपल्यावर काही परिणाम होईल का, याची मात्र त्याना अजिबातच भिती बाटू दिली नाही. फक्त सुख आणि दुःख परिस्थितीमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. ज्यांना सुखकारक वातावरणामध्ये ठेवले होते. त्यांनी 'सुखमय' असे नाव दिले व ज्यांना दुःखद वातावरणामध्ये ठेवण्यात आले होते. त्यांनी त्या प्रक्षुब्ध अवस्थेला 'दुःखद' हे नाव दिले.

       ह्या प्रयोगावरून आपल्याला असे दिसून येईल की, भावनेमध्ये बोधात्मक घटकाचा कार्यभाग फारच महत्त्वाचा आहे. विशिष्ट अशा वातावरणामध्ये एखाद्या विशिष्ट अशा भावनात्मक स्थितीची मनुष्य इच्छा करीत असतो म्हणजे व्यक्तीला शरीराच्या उत्तेजनानुसार त्या स्थितीला तसा अर्थ तो देतो.

संदर्भ :- अभिनव मानसशास्त्र