सामाजिक गटकार्य ( Social group work )
समूहातील सदस्यांच्या समस्या निवारण्याकरीता गटकार्याची पद्धती वापरली जाते. गटातून गटाचा व व्यक्तिचा विकास केला जातो. गटकार्य हि समाजकार्याची . एक पद्धत आहे. जिच्याद्वारे व्यक्तिच्या वर्तणुकीत परिवर्तन घडवून सक्षम केल्या जाते. व्यक्तिच्या विकासासोबत गट विकास केला जातो. व्यक्ति आणि गट परस्परांवर अवलंबून आहे. एकमेकांवर त्याचा परिणाम होतो. गट हे समस्या निर्मूलन करण्याचे एक माध्यम आहे. त्यामुळे गटकार्यात गटास महत्त्व आहे. प्रत्येक सदस्यास विकासाची संधी दिली जाते. व्यक्ति स्वतः बदलतो व त्याच्या सोबत अन्य सदस्यांना बदलण्याकरीता साह्य करतो व गटामध्ये बदल होतो. गटकार्य करीत असतांना उद्दिष्ट केंद्रस्थानी असते. गटकार्याची यशस्वीता उद्दीष्टांच्या यशस्वीतेवर अवलंबून असते. उद्दीष्टे सफल झाली की गट प्रक्रिया यशस्वी झाली. गटकार्य यशस्वी करण्याकरीता उपलब्ध साधनांचा वापर केला जातो. गटकार्या मध्ये गटातील समस्याग्रस्त व्यक्तींची मदत केली जाते. सदस्यांच्या वर्तणूकीमध्ये परिवर्तन हेच गटाचे प्रमुख उद्दीष्ट असते.
१) गटातील सदस्य आंतरक्रियेमुळे होणाऱ्या मार्गदर्शनामुंळे अन्य सदस्यांशी गरजेप्रमाणे नाते प्रस्थापित करू शकतो.
२) Friendlander - " Social Work is a professional service based an scientific knowledge and skill in human relations, which assists, individuals alone or in groups, to obtain social and personal satisfaction and independence."
फ्राईडलॅण्डर : समाजकार्य एक व्यावसायीक सेवा आहे, जी वैज्ञानिक ज्ञान आणि मानवीय संबंधाच्या निपुणतेवर आधारीत आहे. याद्वारे व्यक्तिची एकट्यात अथवा गटात मदत केली जाते. ज्यामुळे ते सामाजिक आणि व्यक्तिगत समाधान आणि स्वातंत्र्य प्राप्त करू शकतील."
वरील व्याख्येवरून स्पष्ट होते की ,
१) व्यक्तीची मदत स्वतंत्र्यरित्या वा गटात केली जाते.
२) मदती मुळे व्यक्तिस व्यक्तिगत समाधान मिळते.
३) ही एक व्यवसायिक सेवा असून वैज्ञानिक ज्ञानावर आधारीत आहे.
3) Hamilton - " Social Group is a psycho social processwhich is concerned no less than with developing Icadership ability and co-operation than with building leaders on the interest of the group for a social purpose."
हॅमिल्टन : " सामाजिक गट कार्य ही एक मनोसामाजिक प्रक्रिया आहे. जी नेतृत्वाची योग्यता आणि गटाच्या विकासाशी तेवढीच संबंधित आहे. जितकी सामाजिक उद्देशांसाठी सामूहिक आवड निर्माण करण्याच्या बांधणीशी आहे".
४) गिजेला कनोप्का : " गटकार्य हि समाजकार्याची एक पद्धत आहे. जिच्यामध्ये, व्यक्तिच्या स्वतःच्या वर्तणुकीत बदल करण्यास किंवा आंतरक्रियेमध्ये सुयोग्य वृद्धी होण्यास मदत केली जाते. हेतूपूर्वक निर्माण केलेला गट अनुभवांतून वैयक्तिक, गट व समुहाच्या पातळीवरील अनेक समस्यांना प्रभावीपणे सामोरे जाण्याकरीता लागणाऱ्या क्षमता वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला जातो."
उपरोक्त व्याख्यांवरून गटकार्याबाबत काही बाबींवर प्रकाश टाकला जातो. गट कार्य करीत असतांना गट हे महत्त्वाचे माध्यम आहे. गट सदस्यांचा विकास म्हणजेच गटाचा विकास होय. गटामध्ये. कायर्यकर्ता सदस्यांना वर्तणुकीत बदल करण्यास प्रेरीत करतो. सदस्यांना बरोबर घेवून सुरक्षा प्रदान करतो. विकासाची नवी संधी निर्माण करतो.जे उद्दीष्ट्ये गटाचे आहे तेच उद्दीष्ट गटातील सदस्यांचे असले पाहिजे.
मार्जूरी मर्फी (Marjurie Murphy) च्या नुसार उद्देशपूर्ण गट अनुभवाद्वारे व्यक्तिच्या सामाजिक कार्यावर भर होय. गटकार्य व्यक्तिच्या गटाच्या उद्देशाच्या प्राप्तीकरीता एक पद्धत आहे. फार पूर्वी पासून गटकार्याचा उपयोग गटाच्या उन्नती करीता केला जात होता. गटातील समस्या आणि उद्देश यांच्यातील समन्वय साधून गटकार्य केल्या जात होते. समाजकार्याचा उपयोग समुहातील लोकांची मदत करण्याकरीता केली जात आहे. गटकार्याच्या व्याख्या अनेक विचारवंतांनी केल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे -
व्याख्या ( Definition of Group work ) :
1) Tracker- " Social Group is a method thrugh which individuals in groups in social agency setting are helped by worker who guide their interaction in programme activities so that they may relate them solves to another and experience growth opportunities in accordance with their needs and capacities to the end of individual, group and community development. The worker is interested in helping to bring about individual growth and social development for the group as a whole and for the community as result of guide interaction."
ट्रॅकर : " गटातील किंवा एखाद्या संस्थेत असणाऱ्या गटातील व्यक्तिला संस्थेतील व्यक्तिला कार्यकर्त्याकडून मदत करण्याकरीता वापरण्यात येणारी गटकार्य ही एक पद्धत आहे. गटातील कार्यक्रमा दरम्यान किंवा उपक्रमा-दरम्यान होणाऱ्या आंतरक्रियांचे कार्यकर्ता मार्गदर्शन करतो यामुळे गटातील सदस्यांना स्वतःच्या गरजांप्रमाणे तसेच क्षमतांप्रमाणे गटातून उपलब्ध होणान्या विकासाच्या संधीचा फायदा घेता येतो. आंतरक्रियांच्या मार्गदर्शनामुळे सदस्य आपल्या गरजेप्रमाणे व क्षमते प्रमाणे इतरांशी नाते जोडू शकतो. कार्यकर्ता दरम्यान घडणा-या आंतरक्रियांच्या मार्गदर्शनामुळे विकासाच्या संधीचा अनुभव मिळतो आणि इतरांशी . नाते जोडता येणे यामुळे सरतेशेवटी व्यक्तिचा, गटाचा आणि शेवटी समुदायाचा विकास घडून येतो."
उपरोक्त व्याख्येवरुन असे स्पष्ट होते की ,
१) गटकार्य हि समाजकार्याची पद्धत असून गटाच्या मदतीकरीता उपयोग केला जातो.
२) गटाला सक्षम बनविण्याची जबाबदारी कार्यकर्त्याची असते .
३) कार्यकर्ता गटाला मदत करतो.
४) गटातील सदस्यांच्या विकासाकरीता लक्ष दिला जाते.
५) गटातील सदस्य आपल्या क्षमतेप्रमाणे संधीचा फायदा घेवू शकते.
६) गटकार्य ही एखाद्या सामाजिक संस्थेच्या आधारावर चालणारी पद्धत आहे.
0 Comments